सद्गुरु श्री देवेन्द्रनाथांचा जन्म दिनांक १६ जून १९३७ (आषाढ शुध्द ९ शके १८५९) रोजी त्रिप्रहरी झाला होता. त्याच्याच निमित्ताने दिनांक १६.०६.२०२५ रोजी सद्गुरु श्री देवेन्द्रनाथांचा ८८ वा जन्म दिवस सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक १४ व १५ जून २०२५ रोजी सुर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गुरुमंत्राचा स्वाहाकार करण्यात आला. त्यानंतर दिनांक १६.०६.२०२५ रोजी सुर्योदय ते सकाळी १०:०० पर्यंत गुरुमंत्राचा स्वाहाकार झाला.
त्यानंतर नाथपंथी हवनाचा कार्यक्रम यथोचित पार पडल्यानंतर दुपारी १२:०० वाजता अनेक ज्येष्ठ नाथजी, साधक, शिष्य यांच्या उपस्थितीत पाळणा गाऊन श्री देवेन्द्रनाथांचा जन्मोत्सव अगदी थाटात साजरा झाला. आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोहळ्याचा समारोप करण्यात आला. ह्या सोहळ्यामध्ये मुंबई, पुणे, श्रीरामपूर, वाळकी, सोनई येथील अनेक नाथ भक्तांनी नाथ सेवेचा लाभ घेतला.



फारच छान धन्यवाद
जयगुरूदेव आदेश.
Khup chan aadesh
Khup chan aadesh