Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi
जय जय कानिफनाथ भगवान योगिराज मूर्ति।पतितपावना ओवाळु तुज सद्भावे आरती। ।धृ ॥
ऋषभपुत्र श्री प्रबुद्ध नामे नारायण मूर्ती।गजकर्णामध्ये षोडस वर्षे केली निज वस्ती।।
नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रह्मस्थिती।द्वादश वर्ष बद्रीकावनी केली तपपुर्ती।।
नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती।विनम्र भावे वस्त्र नेसूनी मिळवी वर प्राप्ती। ।१।।
गंध केसरी सुगंधी पुष्पे अत्तराची प्रिती।नेसून रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती।। सुवर्ण मुद्रा कर्णी बोटी मुद्रीका खुलती।सुवर्ण गुंफीत रुद्राक्षांची माळ गळा रुळती। सुवर्ण मंडीत पायी खडावा कुबडी सोन्याची। बाल रवि सम तळपे मूर्ति दीनानाथ तुमची। ।२।।
गादी मखमली लोड गालीचा शिबिका अंबरी। छत्रे चामरे चौरी ढळती होवून हर्षे भरी।। चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी। भालदार-चोपदार गाती ब्रिदावली गज़री।।सत् शिष्यांचा मेळा – संगे फिरतो अवनीवरी।।हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णु कोठवरी। ।३।।
नाथा तुमचा राजयोग परि विरक्तता विषयी।स्त्री राज्यामध्ये मच्छिन्द्रनाथे परिक्षले समयी।। प्रेमे गोपीचंद रक्षिला असूनिया अपराधी।जती जालिंदर प्रसन्न झाले केवळ कृपानिधी।जन उपकारासाठी शाबरी विद्या निर्मियली।सिद्धा हाती ओपुनी अवनी वरती विस्तारली।।४।।