हनुमानजी हे तपोदैवत आहे असे श्री देवेंद्रनाथ म्हणतात. कोणत्याही नाथपंथी सिद्धाला जर संजीवनी समाधी घ्यावयाची असेल तर समाधीस्थानाच्या जवळ हनुमानजींची स्थापना करावी लागते. आणि हनुमानजींच्या साक्षीने ते संजीवनी समाधी घेतात.
पंचमुखी हनुमान जी म्हटलं की आपल्यासमोर पाच मुखांचे दैवत येते परंतु श्री देवेंद्रनाथ एक मुखी हनुमानजींचा सुद्धा पंचमुखी असाच उल्लेख करायचे. तसेच अनेक नाथपंथी मंत्र आणि तंत्रांमध्ये सुद्धा हनुमानजींचाच मोठा दबदबा आहे. सर्व नाथपंथी सिध्द नाथयोग्यांच्या समाधी स्थानाच्या जवळ हनुमानजींची स्थापना केलेली असते.
श्री देवेंद्रनाथांनी सुध्दा स्वामी राघवेन्द्रांच्या आदेशानुसार मंत्रालयम् जवळील गांधाळ येथे पंचमुखी हनुमानजींची सेवा-साधना केली होती. त्यामुळे हनुमानजींचे संरक्षण प्राप्त करण्याकरिता श्री देवेंद्रनाथांनी साधकांना पंचमुखी हनुमानजींचे कवच पठण आणि हवन करण्याकरिता दिले. कारण ह्या कवचा मध्ये अनेक शक्तींची बीज आलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी श्री सूक्त आणि पंचमुखी हनुमान कवच यांमधूनच मिळतील.