Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

|| श्री देवेंद्रनाथ प्रणित नवध्यान योग ||

साधनेच्या आदल्या रात्री झोपण्यापुर्वी तांब्याचा मोठा तांब्या पाण्याने भरुन उशाशी ठेवावा. सकाळी साधनेस बसण्यापूर्वी एक ते दीड तास आधीपूर्ण तांब्याभर पाणी पिऊन परत झोपावे. झोपून उठल्यावर प्रात:र्विधी आटोपून स्नान करावे. साधनेची जागा स्वच्छ करून निरांजन व अगरबत्ती लावून साधनेस आसनावर बसावे.

पूर्वतयारी

१) आसन : पद्मासनात बसून हात जमिनीवर दोन्ही बाजूला टेकवून त्यांच्या आधाराने शरीर वर उचलायचे व झोपाळ्याप्रमाणे ३ वेळा हिंदोळे (झोके) घ्यायचे. असे ३ वेळा करायचे. त्यानंतर त्याच स्थितीत बसून पाठ न वाकवता मांडी ३ वेळा छातीला लावयची. हे करत असताना शरीरावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करु नये. (झोका-ठोका)

२) प्राणायाम : उजवी नाकपूडी अंगठ्याने बंद करुन डाव्या नाकपूडीने पूरक (श्वास घ्यावा) करावा. नंतर तर्जनीने डावी नाकपुडी बंद करून कुंभक (श्वास रोखावा) करावा. त्यानंतर अंगठा बाजूला काढून रेचक (श्वास सोडावा)करावा. असे ३ वेळा करावे. सुरवातीला पूरक कुंभक रेचकाचे प्रमाण 1: 1.5: 1 (30:48:30) असावे. यावेळी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा अतिरेक करू नये. पूरक व रेचक या दोन्हीही क्रिया संथपणे हळू हळू कराव्यात. कुंभकाचा अतिरेक करु नये.

३) भस्त्रिका : यात फक्त पूरक व रेचकच होतो, कुंभक होत नाही. या क्रियेला कपालभाती असेही म्हणतात. भस्त्रिकेची सुरुवात सूक्ष्म लयाने करुन ती लय हळुहळू वाढवावी. लय वाढवत वाढवत आपल्याला जितका स्पंदन एकदम न थांबविता हळुहळु लय मंद करत परत सूक्ष्माकडे आणावी. अशी भस्त्रिका किमान ३ वेळा करावी. त्यावेळी फक्त पोटाचीच हालचाल करावी व शरीर हलू नये म्हणून हाताचे तळवे मागील बाजूस जमिनीवर टेकवून कोपरांचा बरगड्यांच्या बाजूने आधार घ्यावा.

४) ॐ कार : किमान ३ वेळा दीर्घ ॐकार करावा. हरिॐऽ…ऽ…ऽ..ऽ.ऽ

पूर्वार्ध

१) रक्षाकंकणे : भृग, ऋत व भग या देवतांची उभी रक्षाकंकणे घेणे.

२) मानसपूजा : डोळे मिटून मनानेच गुरुंची पुजा करावी. किती वेळ साधना करणार ते सद्गुरुंना सांगणे. यात भाव निर्माण व्हायला पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे.

३) कुलदेवतेचे शिरस्थानावर आरोहण व स्थानापन्नता.

४) गुरूमंत्रीत दैवतास आवाहन व हृदय कमलावर स्थानापन्नता.

५) श्री गणेशाचे स्मरण व मंत्रपठण – ॐ गं गं गणपतये नमः

६) महाविष्णू, महालक्ष्मी महासरस्वती व महाकाली दैवतांचे शरीराभोवती (आडवी) रक्षाकंकणे घेणे.

७) गुरूमंत्रीत दैवतास (सद्गुरु श्री देवेंद्रनाथास) सविनय भक्तीपूर्ण प्रार्थना करून जपध्यान सुरू करण्याविषयी विनंती करणे.

८) गुरूमंत्राचे जपध्यान.

९) ध्यानयोगाची सांगता, (म्हणजे उत्तरार्ध)

ध्यानयोगाची सांगता

उत्तरार्ध

१) गुरूमंत्रीत दैवतास ध्यान थांबवण्याची विनंती करणे.

२) रक्षाकंकण देवतांना (महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी व महाविष्णु)या देवतांना याच क्रमाने नमन करुन त्यांची भक्तपूर्ण मानसपूजा करून विनयाने गमन करण्यास सांगणे.

३) कुलदेवतेचे स्तवन भक्तिभावाने करुन तिला विनयाने गमन करण्यास सांगणे.

४) भग, ऋत व भृग या दैवतांना याच क्रमाने नमन करून त्यांनाही विनयाने गमन करण्यास सांगणे.

५) हृदय कमलावरील गुरूमंत्रीत दैवतास भक्तीपूर्ण नमस्कार करून गमन न करिता सातत्याने हृदय कमलावर वास्तव्य करण्याची विनंती करणे व ५ ते १० मिनिटे स्थिर राहणे.

६) गुरूचे स्तवन करून गुरुला साधनेच्या कर्माचे फळ अर्पण करावे. ‘समर्पण हीच गुरूची सेवा आहे‘.

या साधनेतून मला मिळालेली फलप्राप्ती मानसपुजेतूनच सद्गुरु चरणी समर्पित करावी.

सूचना : सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी शिकवलेल्या “नवध्यान योगाच्या” पायऱ्या या लेखामध्ये दिलेल्या आहेत. त्याचे विश्लेषण व तंत्र जाणत्या गुरुबंधूंकडून माहित करुन याचा अभ्यास नियमितपणे केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.

नमो आदेश!