श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट

।। ॐ चैतन्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ।।
नाथपंथी द्वैताद्वैत पीठ

नाथपंथी द्वैताद्वैत पीठ
नाथपंथी द्वैताद्वैत पीठ

नाथपंथी द्वैताद्वैत पीठ हे गोरक्षनाथांनी स्थापन केलेलं पीठ आहे. आणि हे नाथपंथी द्वैताद्वैत पीठ देवेंद्रनाथांच्या आधी पैठण येथे ज्ञाननाथांच्या परंपरेतील शिवदीनाथांच्या मठामध्ये होतं. परंतु नंतर पुढे चालून या शिवदीन नाथांच्या मठामध्ये असा प्रकार चालू झाला, की फक्त त्याच कुळातील लोकांना किंवा त्याच पिढीतील व्यक्तींना ते ज्ञान द्यायचे.
हे ज्ञान त्यांनी त्यांच्या घरापुरतेच मर्यादित ठेवलं. जगासाठी त्यातलं काही खुलं केलं नाही. परंतु ही गोष्ट गोरक्षनाथांच्या पिठाच्या साधनेला मारक ठरली.

देवेंद्रनाथांनी असं सांगितलं की जर असं झालं की जर हे ज्ञान जगाला देण्याऐवजी आपल्या विशिष्ट कुटुंबा पुरतंच मर्यादित ठेवलं, तर पुढे चालून त्याचा निर्वंश होतो. त्यामुळे पैठणच्या नाथ पिठाचं असंच झालं. निर्वंश झाल्यामुळे तिथल्या पिठाची परंपरा बंद झाली. देवेंद्रनाथांनी असं सांगितलं की जर असं काही झालं तर तो वंश निर्वंश होऊन मग ते पीठ दुसरीकडे जातं.

त्यानंतर देवेंद्रनाथांना भावावस्था येऊन त्यांनी सांगितलं की शिवाच्या आदेशानेच मी ह्या पिठाची स्थापना करीत आहे. त्यानंतर सद्गुरु श्री देवेंद्रनाथ यांनी या पिठाची स्थापना केली. आणि हे पीठ आपल्याकडे आलं.

द्वैताद्वैत पीठाचा इतिहास-

श्री ज्ञानदेवांनी नाथपंथी परंपरा दोन पद्धतींनी समाजासमोर ठेवल्या. एका बाजूला नामदेव एकनाथ तुकाराम इ. सर्व संत मंडळींनी भक्तीरसाचे रोप लाविले. तर दुसरीकडे सत्यमल,गैबी, गुप्त, उद्बोध, केसरी, शिवदिननाथ ही सिद्ध परंपरा. श्री शिवदिननाथांनी हा मठ स्थापन करून नाथपंथांची फार मोठी सेवा केली आहे. यामुळे महाराष्ट्रात नाथपंथाला स्थैर्य लाभले. पुढे राजाश्रयही मिळाला. पेशव्यांनी ३०০ गावांची जहागिरी ह्या मठाला नेमून दिली होती.

नाथपंथी द्वैताद्वैत पीठ हे गोरक्षनाथांनी आदिनाथांच्या आदेशावरून स्थापन केलेलं पीठ आहे. आणि हे नाथपंथी द्वैताद्वैत पीठ देवेंद्रनाथांच्या आधी पैठण येथे ज्ञाननाथांच्या परंपरेतील शिवदीनाथांच्या मठामध्ये होतं. शिवदिननाथ या नावाने प्रसिद्ध असलेले नाथपंथी हठयोगी यांच्या बद्दलची माहिती थोडक्यात अशी, की श्री. हरि कृष्ण जोशी यांचा जन्म १६९४ मध्ये झाला. त्यांनी केसरीनाथाकडून गुरू उपदेश घेतला. त्यानंतर त्यांना “शिवदिननाथ” असे नाव मिळाले. आपली गुरूपरंपरा सांगताना त्यांनी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सत्यमलनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ व शिवदिननाथ अशी दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेला बाणा (वेष) व योगपटावरील परंपरेतून मिळालेला आहे. त्यामुळे पैठण येथील हा मठ परंपरागत नाथपंथी वारसा जतन करणारा ऐतिहासिक मठ समजला जातो आणि याच ऐतिहासिक मठात नाथपंथी द्वैताद्वैत पीठ होते.

परंतु नंतर या शिवदीन नाथांच्या मठामध्ये असा प्रकार चालू झाला, की हे ज्ञान त्यांनी त्यांच्या घरापुरतेच मर्यादित ठेवलं.
जगासाठी त्यातलं काही खुलं केलं नाही.
अध्यात्मिक वारसा जपण्याच्या ऐवजी मठ म्हणजे एक व्यक्तिगत बाब गणली गेली. त्यामुळे ही गोष्ट गोरक्षनाथांच्या पिठाला मारक ठरली.
देवेंद्रनाथांनी असं सांगितलं की जर असं झालं की जर हे ज्ञान जगाला देण्याऐवजी आपल्या विशिष्ट कुटुंबा पुरतंच मर्यादित ठेवलं, तर पुढे चालून त्याचा निर्वंश होतो. मग ते पीठ दुसरीकडे जातं. पैठणच्या नाथ पिठाच्या बाबतीत असंच झालं.

नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची स्थापना-

अहमदनगर येथील श्री देवेंद्रनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या द्वैताद्वैत पीठाला ऐतिहासिक व धार्मिक महत्व आहे. नाथपंथात द्वैत / अद्वैत असा भेद नसून द्वैताशिवाय अद्वैत नाही हा सिद्धान्त आहे.

दिनांक ६ जुलै १९७४ रोजी गुरूपौर्णिमेचा दिवस होता. ह्या दिवशी श्री देवेन्द्रनाथांनी विधीपूर्वक नगर येथील मार्कंडेय मंदिरात नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची प्रतिष्ठापना नाथांच्या आदेशाने केली. या शुभदिनी श्री देवेंद्रनाथांना व पीठाला आशीर्वाद देण्यासाठी चैतन्य दत्तात्रेय, आदिनाथासह सर्व नवनाथ व देवदेवता या दैवतांची उपस्थिती प्रत्येकाला जाणवत होती. सिद्ध अग्निसाक्ष हवन विधी झाल्यावर वैदिक तसेच शास्त्रीय मंत्राच्या जयघोषात या ऐतिहासिक धार्मिक पीठाची स्थापना झाली. तद्नंतर आपले सद्गुरू स्वामी राघवेंद्रनाथ यांना नमन करूनच वरील देवतांच्या उपस्थितीत श्री देवेंद्रनाथांनी नाथपंथी द्वैताद्वैत पीठाचा मुकुट धारण करून आदिनाथांच्या परमपवित्र पीठावर स्थानापन्न झाले. मंगल वाद्ये वाजू लागली. पुष्पवृष्टी सतत होत होती. त्याचवेळी शंखध्वनी होताच वातावरण अत्यंत आनंदमय, मंगलमय, पवित्र झाले. त्यावेळी सर्वत्र दवणा अत्तराचा सुगंध सर्व मंदिरभर दरवळू लागला. होमकुंड आपोआप तेजाने तळपू लागले. याचवेळी श्री देवेंद्रनाथांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसू लागले. ते एकदम भावावस्थेत गेले. अलख कुंभकातून आलेली व सुहास्य वदनातून बाहेर आलेली नाथवाणी झाली. ‘हम बहोत प्रसत्न है। पीठको छत्र होना। यह पीठ आदिनाथका पीठ है। इसकी पवित्रता रखनी होगी। गुरू बिगर पीठपर कोई बैठना नहीं।’

धीर गंभीर आवाजातील हा संदेश ऐकताच सर्व भक्तमंडळींचे भान हरपले नाही तरच नवल! सर्वत्र एकदम शांत वातावरण झाले. यापुढे या पीठाची हकिगत नाथवाणीतून ऐकावयास मिळाली ती म्हणजे या पिठाला ३०० वर्षाचा इतिहास आहे.

शिवशंकर हे गृहस्थाश्रमी होते. गृहस्थाश्रमी राहून देखील शुद्धाचरणाने व नियमित साधनेने हठयोगी बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री देवेन्द्रनाथ. ते संसारी हाते. खऱ्या अथने श्री शिवदिननाथांची परंपरा, हठयोग साधना त्यांनीच पुढे चालू ठेवली. द्वैताद्वैत पीठ हे त्याचे उत्तम उदाहरण होय! अशा प्रकारे श्री शिवदिननाथ केसरी यांनी गोरक्षनाथांची परंपरा महाराष्ट्रात रूजविली, तोच वारसा श्री देवेन्द्रनाथांनी पुढे चालविला आहे! ह्या गोरक्षनाथांच्या परंपरेतील समाजाभिमुख पीठाचा शिवदिननाथ यांचेकडे वारसा होता. त्या ठिकाणी दु:खितांना दिलासा मिळत असे. तोच वारसा श्री देवेंद्रनाथांनी आदिनाथांच्या आदेशावरून पीठाची स्थापना करून चालू ठेवला आहे.

Latest Updates

  • All Posts
  • News

05/09/2024

सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या ज्ञानाचा आणि नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री मच्छिंद्र नेहे (निरपेक्षेन्द्रनाथजी) यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा श्रावण दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या घरोघरी जावून, अनेक…

Edit Template
Scroll to Top