नमो आदेश 🙏🏻
शनिवार दिनांक २०.०७.२०२४ रोजी नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट तर्फे श्री देवेन्द्रनाथ प्रणित नाथपंथी हठयोग शिबिर आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबीराला अनेक शिष्य, साधक, भक्त उपस्थित होते. ह्या शिबीरामध्ये मुख्यत्वेकरून नाथपंथी साधना, तांत्रिक सुर्य नमस्कार, लघुकथा, आसन, प्राणायाम इत्यादी गोष्टींचा लाभ साधकांनी घेतला.

त्यानंतर दिनांक २१.०७.२०२४ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. श्री देवेंद्रनाथांच्या समाधीला आकर्षक सजावट करुन नाथपंथी परंपरेतील पुढील कार्यक्रम करण्यात आले. त्यामध्ये समाधी पुजन, पंचामृत स्नान, पादुका पुजन, पादुकांवर रुद्राभिषेक, पालखी मिरवणूक, बाबांची भजने, नाथपंथी हवन विधी अशा प्रकारे नाथपंथी साजामध्ये अतिशय थाटात कार्यक्रम होवून त्यानंतर श्री उल्हास देशमुख ह्यांनी छान सत्संग घेवून त्यानंतर बाबांचा झालेला आदेश वाचून दाखवला.
नंतर श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट ने संकेतस्थळाचा (website) लोकार्पण सोहळा ट्रस्टचे सचिव श्री. मदनभाऊ आढाव यांच्या हस्ते पार पडला. ह्या संकेतस्थळावर आपल्याला नाथपंथी द्वैताद्वैत पीठ, श्री देवेन्द्रनाथांचे कार्य, श्री देवेन्द्रनाथांनी दिलेली साधना, संस्थेचे उपक्रम अशी माहिती मिळणार आहे. ट्रस्टच्या सचिवांनी संस्थेचे नियोजित आगामी उपक्रम आणि हाती घेतलेले कार्य या संदर्भात माहिती दिली. अशा प्रकारे ज्येष्ठ नाथजी, गुरुबंधू आणि संस्थेचे सचिव यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्तम रितीने पार पडला. त्यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
जय सद्गुरु श्री देवेंद्र💐🙏🏻