Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

|| प. पू. स्वामी राघवेंद्रतीर्थ - (श्रीक्षेत्र मंत्रालयम, आंध्रप्रदेश) ||

प. पू. श्री राघवेन्द्रस्वामी
विजयनगर दरबारातील विद्वान पंडित तिमण्णा भट्ट यांच्यापोटी १५८१ साली राघवेन्द्रांचा जन्म झाला. विजयनगरच्या पाडावानंतर तिमण्णा भट्ट हे कांचीपुरम जवळील भुवनगिरी या गावी स्थलांतरित झाले आणि तिथेच त्यांना हे पुत्ररत्न प्राप्त झाले. तिमण्णाला स्वप्नात भगवान वेंकटेश्वराचे दर्शन होऊन वरप्राप्ती झाली होती व त्यानंतर हे बालक जन्माला आले, त्यामुळे त्याचे पाळण्यातील नाव वेंकटनाथ असे ठेवले. त्यांचा विवाह सरस्वतीबाई यांच्याशी झाला होता. नंतर ते श्रीमठाच्या प्रमुख केन्द्री अर्थात कूंभकोणमला गेले. श्रीमठाचे महंत श्री सुधीन्द्र यांचे ते शिष्य झाले. नंतर ते विद्वान या पदवीला पोहोंचले. नंतर ईश्वरी आदेशाप्रमाणे त्यांनी संन्यास घेतला. कुंभकोणम् येथे संन्यास घेऊन त्यांनी ‘राघवेंद्र तीर्थ’ हे नाव ग्रहण केले. राघवेंद्रांनी आपले गुरू सुधींद्र तीर्थांकडून, श्री मठाचे मुख्य म्हणून धुरा स्वीकारली. श्री स्वामींच्या अलौकिक बुद्धीमत्तेची चुणूक ते श्रीसुधीद्र तीर्थ गुरुदेवांकडे शिकत असतानाच जाणवली होती. त्यांनी केलेल्या विशाल ग्रंथ रचनाच याची पुष्टी करतात. त्यांनी एकूण तेवीस ग्रंथांची रचना केली. श्री सुधीन्द्र यांच्यानंतर वेंकटनाथ हेच मठाचे पिठाधिपती झाले. ते वरुण यज्ञ करीत तेव्हा खरोखरच पाऊस पड़त असे, मठातील मंदिराची उत्तम व्यवस्था लावून ते परिव्राजक म्हणून बाहेर पडले. हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महत्त्वाचे संत आणि तत्त्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक ग्रंथ लिहिला. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी राघवेंद्रांनी संपूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला. द्वैती तत्त्वज्ञान आणि मध्वाचार्याचा वैष्णव संप्रदाय या विचारधारेतील अधिकारी पुरुष म्हणजे राघवेन्द्र स्वामी होत. ब्रह्मदेवाच्या दरबारातील शंकू तीर्थांचे अवतार म्हणून त्यांना मानले जाई, तर प्रल्हादाचाही पुनरावतार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

मंत्रालायम स्वामीतीर्थ

स्वामींची कर्मभूमी म्हणजे आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील “मंत्रालयम् ” हा परिसर. श्री राघवेंद्र स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेली हि भूमी आहे. मंत्रालयम् चे मूळ नाव “मंचाले “असे होते. प. पू. श्री राघवेंद्र स्वामी हे सदेह असताना या गावी आले असताना त्यांच्या पूर्वजन्मांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांनी असैनीच्या नबाबाचा दिवाण असलेल्या आपल्या परमशिष्याला ही भूमी अत्यंत पवित्र आहे असे सांगितले, नबाबाला स्वामींनी आपल्या दिव्य शक्तीची प्रचिती दिल्यावर त्याने स्वामींच्या चरणी भेट देण्याचे ठरविले त्यावेळेस श्री राघवेंद्र स्वामींनी “मंचाले” गाव भेट म्हणून दे असे सांगितले. त्याप्रमाणे नबाबाने स्वामींना तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेले मंचाले ग्राम भेट म्हणून दिले. त्यावेळेस स्वामींनी मी पूर्वजन्मात भक्त प्रल्हादांच्या रुपात असताना या पवित्र भूमीवर अनेक यज्ञ याग केले आहेत असे आपल्या शिष्यांना सांगितले व तुंगभद्रा तीरावर आपल्या समाधीसाठी जागा निश्चित केली व ही जागा म्हणजे स्वामींनी भक्त प्रल्हादाच्या रुपात जे यज्ञयाग केले ती यज्ञकुंडाची जागा आहे असे सांगितले व तुंगभद्रा तीरावर ज्या पाषाणावर प्रभू श्रीराम यांनी विश्रांती घेतली आहे त्या रामाच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाषाणातून माझे वृंदावन तयार करा असे आपल्या शिष्यांना सांगितले. त्याप्रमाणे प. पू. श्री राघवेंद्र स्वामींनी श्रावण वद्य द्वितीयेला वृंदावनांत प्रवेश करुन संकल्पीत संजिवनी समाधी घेतली. ७०० वर्षे मी या समाधीत राहून भक्तांवर कृपाछत्र धरीन व त्यांचे दुःख दूर करीन असा संकल्प केला, जगाच्या पाठीवर ही एकच संकल्पीत संजिवन समाधी आहे. त्यावेळेस स्वामीच्या आज्ञेवरुन ह्या गावाचे नाव मंचाले ऐवजी “मंत्राच्या जेथे सतत आलाप चालतो असे “मंत्रालयम्” म्हणून ठेवण्यात आले. आजही प. पू. श्री राघवेंद्रस्वामी वृंदावनातून आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवत आहेत व त्यांच्या मनोकामना पूर्ण करुन त्यांना दुःख मुक्त करीत आहेत. श्रावण द्वितीया सन १६७१ साली मंत्रालय या ठिकाणी स्वामी राघवेंद्रांनी स्वेच्छेने संकल्पित संजिवनी समाधी घेवून समाधिस्थ झाले. ते विद्याव्यासंगी, महानयोगी, पंडित होते. त्यांचा काळ हा इ.स. १६२३ ते १६७१ होता. श्री देवेंद्रनाथ वास्तुशास्त्राचा अभ्यास पूर्ण करून पुण्याला आले. तेथे त्यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पुणे येथे देवेंद्रनाथांची नाथांची पूजाअर्चा व योगी मुखर्जीकडून मिळालेली साधना नित्यनेमाने सुरू होती. त्याकाळात देवेंद्रनाथांच्या जीवनात अध्यात्मिक प्रगती असलेले ज्ञानयोगी श्री. सुब्बनवार आले. ते स्वामी राघवेंद्राचे भक्त होते. संसारात राहून परब्रह्म अवस्थेत जाणे हेच जीवनाचे सार आहे, अशी शिकवणूक श्री. सुब्बनवार यांच्याकडून देवेंद्रनाथांना मिळाली. देवेंद्रनाथांची स्वामी राघवेंद्रांची नित्याने उपासना सुरू होती. एकदा साधनेत देवेंद्रनाथ मग्न असताना त्यांना स्वामी राघवेंद्रांचे दर्शन झाले. स्वामींनी दृष्टांत देऊन त्यांचा आधात्मिक दीक्षाविधी केला आणि दीक्षांत नाव “देवेंद्र” असे ठेवले. श्री राघवेंद्र स्वामींनी केलेली ग्रंथ रचना- १) पुरुष सुक्तादि पंच सुक्तांची व्याख्या २) न्यायमुक्तावली ३) तत्व मंजिरी ४ ) मंत्रार्थ मंजिरी ५) वेदत्रय विवृती ६) तत्व प्रकाश भाव दीपिका ७) परिमळ ८) दशोपनिषतखन्दार्थ ९) तत्व दीपिका १०) गीतार्थ संग्रह ११) राम चरीत मंजिरी १२) कृष्णचरित्र मंजिरी १३) दश प्रकरण टीका व्याख्या १४) प्रमेय दीपिका १५) गीता तात्पर्य टीका विवरण १६) निर्णय भाव संग्रह १७) चंद्रिका प्रकाश १८)वादावळी व्याख्या १९) तरक तांडव व्याख्या २०) प्रमाण पद्धती व्याख्या २१) अणुमध्व विजय व्याख्या २२) प्रातःसंकल्प गद्य २३) भाट संग्रह