प.पू. श्री देवेंद्रनाथ महाराज नेहमी म्हणायचे, “माझे आत्मचरित्र माझ्या पत्नीच्या त्यागाच्या शाईनेच लिहावे लागेल…” श्री देवेंद्रनाथ महाराजांनी केवळ आपला प्रपंचाचा विचार कधी केला नाही. हजारो घरांमधे ज्ञानाची व श्रद्धेची ज्योत प्रज्वलित केली. दुःखीकष्टी लोकांच्या जीवनातील अंधःकार दूर केला. आपले जीवन अध्यात्मिक कार्यात वाहून घेतले, तेव्हा त्यांनी कुटुंबाची जबाबदारी माईंवर सोपविली होती. त्यांनी ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. तेव्हा माईंच्या मागे त्यांचे वडिल डॉ. शरदचंद्र आंबेगांवकर व आई सौ. उषा आंबेगांवकर खंबीरपणे उभे होते.
आपल्याला शीतल छाया देणारा वृक्ष प्रखर सूर्यकिरणांचा दाह सहन करीत असतो. ह्याची जाणीवही आपल्याला कधी होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरु कृपेचा छोयेत हजारो, लाखो जण बसतात. मात्र, आपलाला छाया देणाऱ्या वृक्षाची प्रत्येक शाखा माईंच्या रूपात प्रखर दाह सहन करते.