Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

|| सद्गुरु श्री देवेंद्रनाथांची आरती ||

सद्गुरू देवेंद्रनाथ

देवेंद्रनाथा जय देवेंद्रनाथा
धन्य झालो चरणी ठेविला माथा ।।धृ।।

नाथ कृपा झाली, दृष्टांत झाला
राघवेन्द्र गुरु थोर लाभला।।
गुरु कृपेने अधिकार आला
‘जीव – ब्रह्म -सेवा’ धर्म ठरविला। । देवेंद्र ॥१।

संसारी राहे चित्त अध्यात्मी
लोकांना सांगे नाथांची महती।।
शिकविला ‘योग’ वर्णिली ‘ भक्ती’
महिमा ‘ज्ञानाचा’ देवेंद्र गाती । देवेंद्र ।।२।।

कानिफाच्या मठीत होता अंधार
पाण्यावाचून लोक होती बेजार।।
आणिला प्रकाश फुलविली बाग
‘गौतमी’चे झाले पाणी उदंड । देवेंद्र ।।३ ।।

तीर्थ – भस्म देई करी उद्धार
दुःख मुक्त होती भक्त सत्वर।।
नवनाथा विना नाही विचार
सेवे वाचून नाही दुसरा आचार । देवेंद्र।। ४।।

लाविली समाधी बसले ध्यानस्थ
कानिफ मठीचा घेतला शोध।।
वाड्मय नाथांचे केले प्रसिद्ध
वंदी देवेंद्राला देवेंद्र भक्त । देवेंद्र ।।५।।