सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या ज्ञानाचा आणि नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री मच्छिंद्र नेहे (निरपेक्षेन्द्रनाथजी) यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा श्रावण दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या घरोघरी जावून, अनेक नाथ भक्त आणि साधक मिळून होम हवन व नाथपंथी पूजा पार पाडली. संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक ह्या श्रावण दिंडी सोहळ्याचा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असतात. ह्या श्रावण दिंडीच्या माध्यमातून भवदुःख दूर करणे, सत्संग घेणे असे कार्य केले जाते.

